पान:रससूत्र (Rasasutra).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इंद्रिय ग्राहय नाही त्याचे अनुकरण शक्य नाही. एक महत्वाची बाब तोताच्या नजरेतून निसटलेली दिसते ती अशी की, जे जड आहे त्याचे अनुकरण करणे शक्य आहे. एवढे जरी मान्य केले तरी त्यामुळे नाटय हे अनुकरण होते. आपण रंगभूमीवर प्रवेश करणारा राम विचारासाठी घेऊ. रामचंद्राचे कपडे, त्याचे धनुष्य, मुकुट, अलंकार हे सारे जड आहेत, रामचंद्राचे शरीर जड आहे. नटाचे शरीर रामाच्या शरीराचे, नटाचे पोषाख धनुष्य आदी रामाच्या पोषाखाचे, आयुधाचे अनुकरण करीत आहे. असे जरी मान्य झाले तरी त्यामुळे नट रामचंद्राचे अनुकरण करीत आहे असे ठरते. व रंगभूमीवरील देखावे, अयोध्येचे अनुकरण ठरतात. एका जड वस्तूचे अनुकरण होते. इतके मान्य करून तोत अनुकरण वादाचे खंडन करू पाहतात हया खंडणाचा पाया ठिसूळ राहाणार हे उघड आहे. शंकुक स्थायीभावांच्या अनुकरणाचा विचार करीत होता. भट्ट तोतानी भावाचे अनुकरण शक्य नाही हे मत अशा प्रकारे मांडले आहे की, विभाव अनुभवांचे अनुकरण मात्र शक्य आहे असे त्यामुळे सिद्ध व्हावे.
  नाटयात स्थायी भावांचे अनुकरण नसते हा तोताचा आग्रह आहे. त्यासाठी ते भाव अजड आहेत. इंद्रिय ग्राहय नाहीत असा मुद्दा मांडतात. नाटयाच्या बाहेर लौकिक जगात तरी एकाच्या भावनाचे दुसऱ्याला अनुकरण शक्य आहे का? लौकिक जगातही भाव अजडच असणार इंद्रियग्राहय नसणार. लौकिक जगातही भावानुकरण शक्य नाही. ते लौकिक जगात शक्य नाही म्हणून नाटयात शक्य नाही. असा हा मुद्दा आहे. आपण नाटय सोडून देऊ व लौकिक जगात येऊ, एकाच्या हसण्याची दुसरा नक्कल करीत आहे असा प्रसंग घेऊ. हया ठिकाणी अनुकरण कर्त्याच्या ठिकाणी हास्योत्पत्ती आहे असे म्हटले तर तोत म्हणतात, अनुकर्त्याचे अनुभाव त्याच्या स्वतःच्या भावनांचे द्योतक आहेत, म्हणून येथे इतर कुणाच्या हास्याचे अनुकरण होत नाही. तसे मानण्याचे कारण नाही. जर आपण असे म्हटले की, नटाच्या अनुकांच्या ठिकाणी हास्य हा भाव उत्पन्न झालेला नाही. फक्त अनुभावच आहेत तर तोत म्हणणार अनुभाव जड आहेत. चित्तवृत्तीचे अनुकरण ते करू शकत नाहीत म्हणून तेथे अनुकरण नाही. लौकिक जगात कलात्मक व्यवहाराच्या बाहेरसुद्धा एकजण दुसऱ्याच्या भावाचे अनुकरण करू शकत नाही. समजा अशा वेळी आपण एखाद्या हसणाऱ्या माणसाचे आरशात प्रतिबिंब पाहातो आहो तर हया ठिकाणी काय समजावे? तीत म्हणणार प्रतिबिंब ही कुणी व्यक्ती नव्हे. म्हणून तिथे चैतन्य नाही, भाव नाहीत, हास्य नाही, प्रतिबिंबाच्या ठिकाणी फक्त अनुभाव आहेत. म्हणून हे प्रतिबिंब मूळच्या हसणाऱ्या व्यक्तीचे अनुकरण करीत आहे. असे म्हणता यणार नाही. तोतांचा हा आग्रह किती महत्त्वाचा मानायचा याचे उत्तर अनुकरण हा शब्द आपण प्रतिवस्तू हया अर्थाचा मानतो की वस्तु-भासासाठी, आवश्यक


59