पान:रससूत्र (Rasasutra).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसतात तो भ्रम आहे, असे उदभटाचे म्हणणे होते. एरव्ही नटाच्या ठिकाणी भाव उत्पन्न होतात असे मानण्याची आपत्ती येईल, असे त्याला वाटे. भाव प्रेक्षकांना नटाच्या ठिकाणी जाणवतच नाहीत; ते अनुकर्त्याच्या ठिकाणी जाणवणे हीच अनुकरणाची सिद्धी आहे; अशी लोल्लटाची बाजू होती. त्याने नटाला रसास्वाद मान्य केला आहे. शंकुकही नाटय अनुकरणरूपच मानतो. म्हणून विभावादी सामग्री तो कृत्रिम मानतो. कारण शंकुकाचे विभाव अनुकरणरूप नाटयाचा भाग आहेत. हे विभाव कृत्रिम असल्यामुळे नटांच्या ठिकाणी भावाची उत्पत्ती तो मान्य करीत नाही. नटांच्या ठिकाणी भावोत्पत्ती नाही, नटाला आस्वाद नाही ही मुळात उद्भटाची भूमिका; ती शंकुकामुळे पुन्हा महत्त्वाला चढते व त्यानंतर बहुमान्य भूमिका म्हणून, स्थिर होते. हे नाटय अनुकरणरूप असल्यामुळे, नाटयप्रतीती सत्य मानता येत नाही. शंकुक, हा प्रत्यय भ्रम मानण्यास तयार नाही. करण सत्य; संदेह, विपर्यय, भ्रम, मिथ्या, सादृश्य ह्या सर्व उपाधी ज्या प्रत्ययाला लावता येतील, तो प्रत्यय बोधाच्या कक्षेतीलअसतो.शंकुकाच्यासाठी आस्वाद, हा बोधकक्षेतील प्रत्यय नसून भावप्रत्यय आहे. त्या स्पष्टीकरणात, हेही गृहीत आहे की, नाटयस्वादातील भावप्रतीतीचे स्वरूप परगतत्त्वाने असे बोधक नाही. म्हणजे, इतरांच्या भावनांचा बोध नव्हे. अभिधेमुळे येणारा वाचकत्त्वशक्तीचा प्रत्यय निराळा, हा प्रत्यय निराळा. म्हणून त्याने नाटयप्रतीती लोकविलक्षण प्रतीती मानली आहे. शंकुकाने अनुमान हा शब्द न वापरता, अवगमन शब्द वापरण्याचे कारण, बहुधा हे असावे., शंकुकापूर्वी उद्भटाने अवगमाचा उल्लेख केलेला आहे. तो अभिधाभिन्न अर्थाला अवगम मानतो. उद्भटाच्या अवगमाहून, शंकुकाचे अवगमन भिन्न आहे. अनुमानसुद्धा सत्यासत्याचा बोध करून देणारे असणार. अनुमानजन्य ज्ञान भावनिर्मितिक्षम असू शकेल. पण ती भावनिर्मिती आणि नाट्यप्रत्यय ह्यांत फरक आहे.
  ज्यावेळी, आपणांस दोरीवर सापाचा भ्रम होतो, त्यावेळी भीती वाटतेच. पण ह्या भीतीच्या वेळी भ्रमजन्य साप हा आपल्या भीतीचे आलंबन असतो. जेव्हा खरा साप आपण पाहू, तेव्हा सत्य साप, हा आपल्या भीतीचे आलंबन राहील. नाटयप्रत्ययात आलंबन वा आश्रय नाटयातील प्रकृती असणार, आपण भावनिर्मितीच्या आश्रयविभाव नसून फक्त आस्वादक असतो. ज्यावेळी प्रत्यक्ष साप दिसणार नाही, पण एखादी " फरकांडी" दिसेल त्यावेळी ह्या लिंगामुळे जवळ 'कुठेतरी साप फरफटत गेला आहे, हे अनुमान होतेच. वाघाबाबत त्याच्या पदचिन्हांना, लिंग म्हणावे लागेल. ही लिंगे खरी असोत, खोटी असोत, कृत्रिम असोत; ती अनुमानाला आधार असतात. लिंगांच्यावरून लिंगीचे अनुमान होणार. ही अनुमिती भावनिर्मितीही करू शकेल. पण अशा वेळी, पुन्हा अनुमित लिंगिन् हा आलंबनविभाव होणार आणि आश्रयविभाव होणार. अनुमान बोधक असल्यामुळे अनुमित वस्तू भावनिर्मिती कर


५०