पान:रससूत्र (Rasasutra).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आहे. शंकुकाच्या ह्या उत्तराने पुढील सर्व काव्यशास्त्र प्रभावित झालेले आहे. शंकुकानंतर येणाऱ्या बहुतेक सर्वानी रससूत्रात स्थायीचा उल्लेख सहेतुक मानला व हया अनुल्लेखाचे समर्थन केले.
 नाट्यशास्त्रात स्पष्टपणे कुठेही स्थायीभाव पुष्ट होतो, असा उल्लेख नाही. व्यवहारतःशंकुकासमोरची अडचण अशी आहे की, स्थायीभाव पुष्टच होतील असा नियम नाही, त्यांचा उपशमही होईल आणि स्थायी नेमका किती पुष्ट झाला, म्हणजे त्याला रस म्हणावे, हा अडचणीत टाकणारा मुद्दा उपस्थित होईल. म्हणून स्थायी पुष्ट होण्याचा मुद्दा बाजूला सारून जर विचार करता आला, तर तो त्याला हवा आहे. स्थायीभाव कोणत्याही अवस्थेत रस होतो हे मत शंकुक देतो. म्हणजे मुनिवचनही सांभाळले जाते व व्यावहारिक अडचणींचाही निरास होतो. हया ठिकाणी दुसऱ्या बाजूने अडचण उभी राहते. 'मला शोक झाला आहे' असे जर कुणी म्हटले तर तिथे करुणरस मानावा काय ? शंकुकाचे हयाला जर उत्तर असे की, येथे स्थायीचे आगमन होत नाही, म्हणून येथे रस नाही. या उत्तराने एकीकडे प्रेक्षक रसास्वादाशी अवियोगाने बांधला जातोः दुसरीकडे स्थायी अगर रस स्वशब्दवाच्य असू शकत नाहीत हे ठरते. स्थायीभाव व रस स्वशब्दवाच्य असू शकतात असे उद्भटाचे मत होते. हया मताचे पहिले ज्ञान खंडन या ठिकाणी आहे. रस, स्थायीभाव, स्वशब्दवाच्य असू शकत नाहीत हा पुढे बहुतेक सर्वांनी मान्य केलेला मुद्दा आहे.
  नाटयशास्त्रात, नाटयरस असा शब्दप्रयोग आहे (६।३३ व हयापूर्वीचे गद्य) हथा शब्दप्रयोगामुळे एक प्रश्न असा निर्माण होतो की, हयांना नाटयरस का म्हणतात? खरे म्हणजे हा क्रमाने तिसरा प्रश्न आहे. ज्याला नाट्यविचक्षण रस म्हणतात तो पदार्थ आहे तरी काय? हा पहिला प्रश्न. या पदार्थाला रस का म्हणतात ? हा दुसरा प्रश्न व नाटयरस का म्हणतात? हा तिसरा प्रश्न. लोल्लटा नुसार पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की, रस म्हणून जो पदार्थ ओळखला जातो, 'तो स्थायीभाव आहे. हा भाव पुष्ट होतो तेव्हा त्याला रस म्हणतात. हे नाव परंपराप्राप्त आहे (आप्तोपचारसिद्ध आहे.) हा रस, नाटकात प्रयोजित केला जातो म्हणून त्याला नाटयरस म्हणतात. शंकुकाची हया प्रश्नांनी उत्तरे अशी आहेत रस म्हणून जो पदार्थ ओळखला जातो, तो स्थायीभाव आहे. स्थायीभाव लौकिक जीवनातही असतात. पण ते रस नव्हत. कारण ते आस्वाद-विषय होत नाहीत. नाट्यात जे अनुकरणरूप स्थायीभाव असतात, त्यांनाच रस म्हणतात. कारण ते आस्वादिले जातात. जे आस्वादिले जातात ते आस्वादविषय असल्यामुळे, रस म्हटले जातात. स्थायीभाव अनुकरणरूप असले तरच ते आस्वाद्य होणार व ते फक्त नाट्यातच अनुकरणरूप होणार, म्हणून त्यांना नाटयरस म्हणतात. हावरून हे ठरते की, रस फक्त नाटयात असतो. लौकिक जीवनात नसतो. पुढे चालून बहुतेक सर्वांनी हे मत


47