जात आहे. अनुमित नसणारा पूर्वसिद्ध स्थायीभाव या विवेचनात प्रथम येतो. नंतर त्याचे अनुकरण होते, व ह्या चिन्हांच्या आधारे पुन्हा स्थायीभाव अनुमित होतो. ही भूमिका भावातून रस सांगणारीच आहे. स्वतःची भूमिका भावांतून रस ही असताना शंकुक लोल्लटाच्या त्याच प्रतिपादनावर आक्षेप घेऊ शकत नाही. या कारणांच्यामुळे मी शकुंकाच्या आक्षेपाचे बहुमान्य स्पष्टीकरण स्वीकारू शकत नाही.
मी ह्या आक्षेपाचा अर्थ असा करतो. लक्षण म्हणजे व्याख्या. लक्षणांतर म्हणजे व्याखेत भेद. भरतांनी रस आणि भाव ह्यांच्या व्याख्या निरनिराळ्या दिल्या आहेत. जर भाव हेच रस होतात. पुष्टस्थायी रस होतो असे मानले, तर ह्या दोन व्याख्यांच्या मधील भेद व्यर्थ होतो. रसांची व्याख्या व भावांची व्याख्या एकच होऊन जाते. ज्या अर्थी नाट्यशास्त्रात रस व भाव ह्यांच्या दोन भिन्न व्याख्या आहेत त्या अर्थी भरतमुनींना रस व भाव ह्या कल्पना भिन्न म्हणून गृहीत आहेत व म्हणून लोल्लटाचे विवेचन अग्राह्य आहे, असा शंकुकाचा आक्षेप आहे. हा आक्षेप उत्पत्तिवाद, पुष्टिवद ह्या विरुद्ध नसून मुनी वचनसंमततेच्या संदर्भात आहे. सर्व ग्रंथ सुसंगतपणे लावून दाखविण्याची जबाबदारी न घेणाऱ्या परंपरेतून असे आक्षेप यावेत ही आधुनिकांना आश्चर्याची वाटणारी बाब असली तरी प्राचीनांना ती स्वाभाविक बाब आहे. नैय्यायिक नेहमीच इतरांच्यावर आक्षेप घेताना लक्षणग्रंथाशी विरोध येतो, हा आक्षेप घेत आले आहेत. लक्षणांतर वैय्यर्थ्याचा हा आक्षेप किती महत्त्वाचा समजावा हे नाट्यशास्त्रातील कोणते वचन प्रमाण मानावे ह्यावर आधारीत राहील. स्थायीभावांनाच रस हे नाव लाभते असे नाट्यशास्त्राचेच मत आहे म्हणून लोल्लटकृत विवेचन भरत संमत म्हणता येते. ज्याअर्थी पुष्टस्थायी म्हणजे रस अशी व्याख्या न देता रससूत्र, रसाची निराळी व्याख्या देते त्या अर्थी मागचा पुढचा संदर्भ सोडून, फक्त रम सूत्राचा विचार केला तर नामांतर व लक्षणांतर ह्या आधारे शंकुकाला आक्षेप घेता येतो. नाटयशास्त्राची संमती, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला व नाटयसूत्र समोर ठेवून दोन प्रश्न विचारले तर त्याचे लोल्लटप्रणीत उत्तर शंकुकाच्या उत्तराच्या मानाने लंगडे आहे. पहिला प्रश्न असा स्थायीभाव आणि रस ह्या दोन भिन्न शब्दांचा नाटयशास्त्रात वापर होण्याचे कारण काय ? लोल्लटप्रणीत उत्तर, नाटयशास्त्रातच सापडते. आस्वादिला जातो म्हणून स्थायीभावाला रस म्हणतात असे हे उत्तर आहे. हे उत्तर ग्रंथसम्मत असले तरी समाधानकारक नाही. कारण आस्वाद फक्त स्थायी भावाचाच नसतो इतर घटकांचाही आहे, त्यांना रस म्हणत नाहीत. शंकुकाचे उत्तर असे की स्थायी आणि रस हे भिन्न आहेत म्हणून नावे भिन्न आहेत. नैय्यायिक अनुमित ज्ञानाने येणारी प्रतीती, मूळ वस्तूच्या प्रतीतीहून भिन्न मानतात. दुसरा प्रश्न असा की रससूत्रात स्थायीभावाचा उल्लेख का नाही ? लोल्लटाचे उत्तर हे की स्थायी भावच रस होतो म्हणून स्थायीचा उल्लेख नाही. हेही उत्तर ग्रंथसंमत आहे पण
27