पान:रससूत्र (Rasasutra).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नाटयशास्त्राचे आहे. शंकुक आणि लोल्लट यांच्यात खरा फरक असेल तर तो विभावाच्या कल्पनेबद्दल आहे. शंकुक विभाव लिंग आहेत. स्थायी अनुमेय आहे असे मानतो. लिंग आणि अनुमेय यांचा संयोग कसा होणार असा आक्षेप घेतो. नाटयशास्त्रात विभाव हे लिंग नाहीत. ते जसे विज्ञानार्थ आहेत तसेच कारण आहेत. ते विज्ञानार्थ आहेत म्हणून ते अनुमानाचे आधार आहेत. हे शंकुकाचे मत नाटयशास्त्राला मान्य नाही. लोल्लटालाही मान्य असण्याचे कारण नाही. जे उत्पत्तीचे कारण आहेत त्याचा संबंध जन्य-जनकाचा असतो. तिथे संयोग असतोच. आणि विभाव एकच एक नसतो. विभाव अनेक असतात. जे विभाव उत्पत्तीचे हेतू असतात ते आलंबन विभावाच्या गटात जातात. जे पुष्टीचे कार्य करतात ते उद्दीपन विभावाच्या गटात जातात. विभावाच्या गटात जातात. विभावाची जी कल्पना लोल्लटासमोर आहे तिच्यावर शंकुकाचा आक्षेप लागू पडत नाही.
'  शंकुकाचा दुसरा आक्षेप " लक्षणांतर वैय्यर्थ्याचा" आहे. या आक्षेपाचा अर्थ काय ? बहुतेकांनी ह्या आक्षेपाचा आशय स्पष्ट करताना असे म्हटले आहे की नाटयशास्त्राच्या ६ व्या अध्यायात रसांची लक्षणे व विवेचन आले आहे आणि सातव्या अध्यायात भावांची लक्षणे व विवेचन आलेले आहे. जर स्थायी पुष्ट होऊन तोच रस होत असेल तर मग दोहोंची दोन वेळा लक्षणे सांगणे व्यर्थ होऊन जाईल. काहीजण यापुढे जाऊन अध्यायाच्या क्रमालाही महत्त्व देतात. नोली, ग. व्यं. देशपांडे, इत्यादी विवेचक ह्या गटात आहेत. ते म्हणतात सहाव्या अध्यायात आधी रस-विवेचन आहे. संग्रहकारिकेत रसाचा आधी उल्लेख आहे. भाव-विवेचन नंतर आलेले आहे. हा क्रम समोर ठेवून विचार करायचा तर असे म्हणावे लागेल की भरताचे विवेचन रसातून भावाकडे जात आहे. लोल्लटाचे विवेचन भावातून रसाकडे जात आहे. शंकुकाच्या आक्षेपाच्या बाबत या स्पष्टीकरणाला हेमचंद्राचा आधार आहे
 शंकुकाच्या आक्षेपाचा हा आशय मान्य करणे कठीण आहे. याचे पहिले कारण असे की नाट्यशास्त्रात सहाव्या अध्यायातच रसातून भाव, भावातून रस, रसभाव यांची परस्पर-सिद्धी असे तीन पक्ष नोंदविलेले आहेत. ही नोंद करताना 'भावातून रस ही भूमिका स्व-संमत पक्ष म्हणून सांगितली आहे. दुसरे कारण असे की सहाव्या अध्यायात रस-विवेचन प्रथम आलेले असले तरी भावांतून रस हीच भूमिका या विवेचनात आहे. दृष्टांतातही हीच भूमिका आहे. म्हणून भरताचे विवेचन रसातून भावाकडे जाणारे नसून भावांतून रसाकडे लोल्लटाप्रमाणेच जात आहे असे म्हणणे भाग आहे. खरी गोष्ट ही आहे की भरताचे विवेचन ज्या क्रमाने जाते त्याला अनुसरून लोल्लट जातो. तिसरे कारण आहे की शंकुक हा आक्षेप घेऊ शकत नाही. शंकुक नैय्यायिक असल्यामळे आरंभवादी असण्याचा संभव अधिक. ह्या दर्शनानुसार स्थायीपेक्षा अनुमित स्थायी निराळा होतो. पण शंकुकाचे विवेचनही भावातून रसाकडे


26