पान:रससूत्र (Rasasutra).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



. समाधानकारक नाही. शंकुकाचे उत्तर असे की रससूत्रात फक्त लिंगाचा उल्लेख आहे. स्थायी लिंग नाही. म्हणून त्याचा उल्लेख नाही. सर्व ग्रंथ समोर ठेवला तर शंकुकाचे आक्षेप फोल होतात. फक्त रससूत्र घेऊन चर्चा केली तर शंकुक अतिशय प्रभावी वाटतो. नैय्यायिकाच्या वादपद्धतीचे हे नेहमीचेच स्वरूप राहात आले आहे.
 शंकुकाचा ह्यानंतरचा महत्त्वाचा आक्षेर असा की पुष्ट स्थायी भाव म्हणजे जर रस मानला तर ह्या पुष्टतेचे प्रमाण काय ठरवणार? पुष्टतेची अवस्था रस मानली तर अनेक रसप्रकार होतील. कामाच्या दहा अवस्थांच्या मानाने रसांचे असंख्य प्रकार होतील. पण नाटयशास्त्रानुसार हास्याचे फक्त सहा आणि शंगाराचे फक्त दोन प्रकार आहेत. पुष्ट स्थायीच्या मुद्दयावर हा उलगडा कसा होणार? शंकुकाने न नोंदवलेला एक आक्षेप आपण येथे गृहीत आहे असे समजू. तो हा की जर स्थायीची पुष्टतम अवस्थाच रस मानली तरी नाट्यशास्त्रातील रस प्रकार संभवत नाहीतच. ह्या आक्षेपाला एका परीने अर्थ आहे. पुष्टतेचे कोणतेही प्रमाण ठरविता येणार नाही. हे खरेच आहे. स्थायीभाव पुष्ट होतात, असे नाट्यशास्त्र स्पष्टपणे कुठेच सांगत नाही. पण हा आक्षेप घेण्याचा शंकुकाला तरी काय अधिकार आहे ? कारण त्याच्या भूमिकेनुसार तरी रसप्रकार कसे संभवणार ? अनुमित स्थायीचे प्रकार पाडण्याची सोय शकुंकाने । काही केलेली नाही. पुन्हा शंकुक नैय्यायिक परंपरेप्रमाणे तुम्हाला ग्रंथ संमती नाही इतकच दाखवून थाबतो. तो स्वतःला नाट्यशास्त्राची संमती दाखवू शकत नाही.
 शंकुकाचा शेवटचा आक्षेप एक समीक्षाशास्त्रीय विचार म्हणून महत्त्वाचा आहे. केवळ कुशाग्र बुद्धीच्या आधारे, तो एक महत्त्वाचे सत्य नोंदवीत आहे. शंकुकाचा आक्षेप असा आहे की, स्थायी पुष्टच होतो असा नियम नाही. कालांतराने स्थायी मंदही होऊ शकेल, व्यभिचारी भावाच्या योगाने स्थायीचा -हासही होऊ शकेल हा आक्षेप जसा जीवनाच्या संदर्भात आहे तसाच तो वाड्मयाच्याही संदर्भात आहे. नायक नायिकेची भेट झाल्यानंतर त्यांचे प्रेम क्रमाने वाढत गेले असे जसे दाखवता येईल तसे उत्पन्न झालेले प्रेम क्रमाने विरून गेलेले, ओसरत गेलेलेही दाखवता येईल. नाटयात रतीची पुष्टीच असेल असे नाही. रतीचा -हासही विषय होऊ शकेल. आक्षेप अत्यंत मार्मिक आहे. नायकनायिकांच्या रतीचा -हास संस्कृत नाट्य वाड्‍मयात कुठे चित्रित झालेला दिसत नाही. कोणतीही समीक्षा समोर उपलब्ध असणाऱ्या वाड्मयाचाच विचार करते, म्हणून शंकुकापूर्वी इतर कुणी स्थायी भावाच्या ‌‌‌‌-हासाचा विचार केलेला दिसत नाही. समोरचे वाड्मय नजरेपुढे ठेवून आपण असे म्हणू शकतो की, जो स्थायी पुष्ट होतो त्यालाच आम्ही रस म्हणू. जो स्थायी क्रमाने ओसरलेला दिसतो त्याची गणना स्थायी म्हणून न होता जे काही पुष्ट होत असेल त्याचा व्यभिचारीभाव ह्या संदर्भात करावी लागेल. आपल्या मर्यादेत हे उत्तर .खरे व समर्थनीय मानता येईल. पण आज आपण वाड्मयात जे चित्र पाहतो आहो त्याचे काही वेळा स्वरूप असे आहे की क्रमाने

२८ .