पान:रमानाटक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

ला पाहिजे; तर तुला गुजराथी येतच आहे. आणि ती नौकरी तुझ्या योग्य आहे.
कृष्णा ०. —वरें तर मी कबूल आहे. परंतु पगार काय देणार ?
वळ० – अरे पगार वाढवून घेणें आपल्याकडे आहे, तरी तो वीस रुपयेपर्यंत पगार देईल असे वाटते.
कृष्णा० – ठीक आहे; मग केव्हां ही तजवीज करणार?
बळ० - मी त्याला आज जाऊन भेटतों व नक्की क रतों. उद्यांपासून तुला नेऊन रुजू करतों. म्हणजे झाले ना ?
कृष्णा॰—आधीं ही गोष्ट दादांना कळवूं नको.
बळ – कां बरें ? दादा काय करणार?
कृष्णा० -तर्फे नव्हे, मी रुजू झाल्यावर कळली म्हण जे ते म्हणतील कीं आतां काळजी करूं लागला.
बळ० - शाबास ! इतकाच मनांत आनंद ना ? बरें तुझ्यासारखे कां होईना. आतां मी जातों.
कृष्णा ● –चरे तर. ( बळवंतराव निवून जातो; कृष्ण- राव मनाशीच ) मित्र असावा तर असाच ! किती माझ्याविषय त्याला वाईट वाटतें आहे ! तर आतां आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणेच वागले पाहिजे. ( खिशांतून घड्याळ काढून पाहतो ) अरे बराच वेळ झाला. घरीं आईने आपल्याला लौकर बोला- बिर्ले आहे. (अर्से बोलून निवून जातो. ).