पान:रमानाटक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

आहे तर चार गोष्टी सांगून त्याला मार्गाला लाव; परंतु मी काय करू, माझ्याही मनांत फार आहे की जर तूं माझ्या ह्मणण्याप्रमाणे चाललास तर फरा चांगले होईल.
कृष्णा० – मित्रा आतां मी माझ्या मनाचा दृढ नि- चय केला आहे की मी तुझ्या मतानें चालेन, परंतु माझें एक मागणें आहे.
बळ० – काय तुझ्या मनांत असेल तें मला सांग. योग्य असल्यास मी फार खुषीनें कबूल करीन. कृष्णा० - दुसरे कांहीं नाहीं. मला गाण्यावाज- विण्याचा छंद आहे; याकरितां स्वतंत्र एक जागा बसण्याला घेऊन रात्री दोन तास तेथें आनंदांत घालवावे.
बळ० – अरे, उद्योग करूं लागलास म्हणजे अशा कामाला कोणी नांव ठेवणार नाही. परंतु आपण बेताने वागावे हे चांगले.
कणा० – ह्याविषयी काळजी नको. आतां तूंच मला एखादी नौकरी लावून दे म्हणजे दिवसभर नौकरी करून रात्री जेवण झाल्यावर दोन तास बसत जाईन.
बळ०- ठीक आहे. मला परवां एकानें सांगितलें आहे कीं, सदरबाजारांत लक्ष्मणराव म्हणून कोणी मराठा कंत्राटदार आहे त्याला गुजराथी लिहिणा- रा कारकून पाहिजे. कारण, त्याचा भागीदार गु- जराथी आहे; तेव्हां जमाखर्च सर्व त्या भाषेत ठेव-