पान:रमानाटक.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.
प्रवेश २ रा.
स्थळ ---सोलापुर शहरांतील कृष्णरावाच्या दिवाणखान्याशेजारील खोली.
रमा– सकु – ( रमेची आई.)

रमा – ( मनाश ) काय बाई करावं !मनाला को- णतेही प्रकारानं सुख लागत नाहीं. संमारामध्य आनंद काय तो पतीपासून, आणि तेच जर मना- योग्य नसेल तर जन्मभरपर्यंत दुःखावांचून साभ- नच नाहीं. पुष्कळ पैसा असो अथवा मुळींच नसो, खाण्यापिण्याचं सुख असो किंवा नसो. सामुसासरे वगैरे वडील माणसं असोत नसोत. घरदार असो नसो. परंतु एक मनायोग्य पतीवांचून सर्व व्यर्थ आहे. ईश्वरानं मला रूप दिलं खरं परंतु बाच्या योग्य जर पति सुख असतं तर मा झ्यासारखी भाग्यवान कोणीच नसती.आई- बापांनी लहानपणी लग्न करून या करंव्या- च्या पदरीं मला बांधली. नाही सत्तेचं. घर किंवा शेत! रूपानं तरी चांगला असावा, तर तेहीं नाहीं! गुणावर लक्ष द्यावं तर आंवळ्या येव्हढं पुज. तेव्हां मी या चांडाळाच्या घरी राहून कोण- त्या रीतिनं सुख मानूं ? परका विचार करावा तर आईबापाच्या नांवाला काळोखी लागते. माझ्या