पान:रमानाटक.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

रतोस. तुला हाणावें काय ! अशाने परिणाम लागेल कां घरीं जरी बोलत नाहींत तरी आपण विचार केला पाहिजेना ? परवां तुझे दादा आणि मी बाजारांत गेलो तेव्हां तुझ्याबद्दल त्यांना दोघां तिघांनी फार दूषण दिळे त्यामुळे दादांना फार वाईट वाटले पण करणार काय? तुझ्या पुढे कांहीं उपायच नाही. आह्मी जरा ज्यास्त बोलावे तर तीही पंचाईत. तूं विचार कर. अरे बाचा सर्व करावें, परंतु कोणाच्या दूषणाला अधिकारी होऊं नये. आपला उद्योग क रून पाहिजे तें केलें तरी कोणी नांवें ठेवीत नाहींत.
कृष्णा० – तूं ह्मणतोस तें मी समजत नाहीं कां, परंतु मी तरी काय करूं!
ळव० – अरे करायचे काय ! प्रयत्न केल्यावर काय होणार नाहीं !
कृष्णा० – तें सर्व खरें परंतु आतां तूंच सांग. काम करू तें. आजपासून तुझ्या सांगण्याबाहेर मी कध वागणार नाही.
ळच० – असा जर नियमानें चालशील तर सर्वांना आ नंद होईल. तुझ्या अंगी गुण नाहीं कां? परंतु त्या सर्वाची तुं आपल्या हाताने माती करून टाक- लीस. तुझ्या दादाला या गुणामुळे किती आनंद वाटतो. आणि ते अक्षई ह्मणत असतात की आम- च्या कृष्णाची बरोबरी करणार कोणी नाही. परंतु या स्वच्छंदपणाने त्यावर त्याने पाणी घातलें. मला त्यांनी कितिक वेळां सांगितले की तुझा त्याचा स्नेह