पान:रमानाटक.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
रमानाटक.

ना० – त्याविषयीं तुझी काळजी करूं नका. ( इत- क्यांत रमा येते. )
र० - ( बाजूस उभी राहून) आज किती दिवस मी कृष्णरावाचा शोध करतें, परंतु कुठं ठिकाण ला- गेना. शेवटीं आज एकदांचा पत्ता लागला; पण ते नारायणशेट कुठं राहतात कोण जाणे. आपण आ तां बाजारांत जाऊन त्यांच्या दुकानाचा शोध करावा. ( अर्से बोलून पुढे येते व कृष्णरावास पा- हून) अहाहा! हे कृष्णराव बसले आहेत. देवा, फार चांगलं झालं, लौकर गांठ पडली. पण आतां मी त्यांना काय बोलूं ? ते मजवर रागावून इकड आले तेव्हां माझं बोलणंही मान्य करतात की नाहीं कोण जाणे. (विचार करून) असो, एकदम जाऊन आपण त्यांचे पाय धरावे ह्मणजे ते शहाणे आहेत. केवळ माझा धिःकार करणार नाहीत. ( त्याच्याजवळ जाऊन त्याचे पाय धरते. )
कृ० – कोण हें ? रमा, हे काय करतेस ?
र० – माझ्याकडून झालेल्या सर्व अपराधांची क्षमा करावी अशी माझी विनंती आहे. मला आतां सर्वस्वी पश्चात्ताप झाला.
कृ० – असे भलतेच काय बोलतेस ?
र० – खरोखर कृष्णराव, या जगांत तुमच्यासारखा. सुस्वभावाचा मनुष्य मिळणं ह्मणजे भाग्याची गोष्ट आहे. मी चांडाळणीनें पुरा विचार न करतां इक- कडच्या मनाला दुखिवलं याविषय मला फार