पान:रमानाटक.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

७३

वाईट वाटतं. तर आतां क्षमा करून मला आपल्या पायांजवळ राहू द्या.
कृ० – बरें क्षणभर थांब. येथून मी घरी येतों मग आपण बोलू.
ना० – कृष्णराव, शरण आलेल्यास मरण देऊं नये. तर आतां तुह्मी तिच्याविषयीं मनांत कांहीं आणूं नका.
कृ० – आपल्या वचनाबाहेर मी नाहीं.
ना० – बरें तर, चला. आपण घरी जाऊन बोलत बसूं.