पान:रमानाटक.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

७१

ल झाला ह्मणने ठीक पडेल. नाही तर भावाची फेरबदल झाली असें पाहून विनाकारण सूट मागेल.
कृ० - ठीक आहे.
नारा० – कृष्णराव, माझें तुह्माला इतकेंच सांगणे आहे कीं, तुमचा आणि माझा स्नेह पूर्वीपासून असल्या कारणानें तुह्मी दुःखी किंवा वाईट स्थितीत असलेले माझ्यानें पहावत नाहीं. याकरितां तुह्मी मला सोडून कुर्डेच जाऊं नका. मी तुमचें कल्याणच करीन. मलाही पाठबळ कुणाचें नाहीं. परस्परांनीं परस्परांस मदत केल्यामुळे चांगले होईल. तुझाला हरएक बाबतीनें सुख लागेल. तशांत अशी तज- वीज करीन परंतु मला सर्व बाबतीने धंद्याच्या बाबी चांगली मदत कर ह्मणजे मी थोडे दिवसांत काय प्रकार करतो ते पहा.
कृ० – मला तर आतां कशाची आशा नाहीं. तुह्मीं सांगाल तसा मी वागेन. कारण, मी सर्वाची आशा सोडली. फक्त दोन वेळां जेवण आणि कपडालत्ता वगैरे. याशिवाय मला कांहीं नको आणि कोठें जाण्याचीसुद्धां आशा नाहीं. फिरफिरून थकलों, आतां तुझी ह्मणालां त्याप्रमाणे धंद्याच्या कामी मी चांगलीच मेहनत घेऊन व्यवस्था ठेवीन.
ना० – इतके असल्यावर मी फार खुषी आहे. कारण धंदा वाढविण्याला मनुष्यबळ पाहिजे; नाहीं तर चहूंकडे लक्ष न पुरल्यामुळे नफ्याचा धंदा नुक- सानीला कारण होतो.