पान:रमानाटक.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
रमानाटक
प्रवेश १५.
कृष्णाजीपंत व नारायणशेटे.

कृ० -- (मनाश) काय करावें? स्त्रीछंद फार खोटा आहे. यांच्या नादांत गुंग होणें ह्मणजे अगदी वाईट आहे. बरें झालें, मी तिच्या त्रासांतून सुट लों. इथे नारायणशेट यांचा व आपला स्नेह चां- गल्या रीतीचा आहे. व त्यानेही आपल्याला सर्व प्रकारें आनंदांत ठेवले आहे. तर आतां विना- कारण दुसरीकडे फिरण्यापेक्षां आपण होईल तितक्या मेहेनतीनें त्याच्या व्यापारांत त्याला मदत करावी. तो समजुतदार आहे. आपले कर्धी अहित करणार नाहीं. आपण जर त्याच्याशी चांगल्या रीतीने वागलों तर चार लोकांत मानमान्यता होऊन तो सर्व तऱ्हेनें आपली तजवीज चांगली करील. ( इतक्यांत नारायणशेट येतो.) या असे इकडे.
ना० – कां? काय विचार चालला आहे ?
कृ० –कांहीं नाहीं, कालच्या हुंडीचा जमाखर्च करित बसलो आहे.
नारा० –बरें, अहंमदनगराहून कालिदास गुजराक- डून परवां पत्र आलें होतें कीं तुमचेकडील बाजार- भावाची यादी पाठवा. तर त्याला यादी इतक्यांत पाठवूं नका. कारण, आपले पूर्वीचे बाकीचा निका-