पान:रमानाटक.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

दुष्ट शब्दानीं दोषीत करून वैन्या प्रमाणं इथून घालवून दिलं ( रडूं लागतें ) आतां मला आपलं तोंड केव्हां दृष्टीस पडेल. आपल्या वांचून या जगांत मला कोणीच प्रिय दिसत नाहीं. बायकां- ची अल्प बुद्धि आज मला खरोखर कळून आली, मी जे आपल्याबरोवर दुष्टाचरण करून सहास केले त्याचा आतां मला पश्चात्ताप झाला. देवा त्या मूर्तीच्या हातून माझं आहित कधींच झालं न नसतं, इतका जरी प्रसंग त्यांच्यावर होता, परंतु त्यानीं कधींच मला दुखीवलं नाहीं. ( विचार क रित स्तब्द राहतें. )
सकु० – रमा अशी काय सुस्त बसलीस शिपाई आ- णून याची चौकशी केली पाहिजे.
र० – ( रागाने) जा तुला हवं तें कर, मला साफ तुझं ऐकायचं नाहीं. मी आपली पोरीला घेऊन कृष्णरावाचा शोध करीत जाग आणि त्यांना भेटून सर्व अपराधाची क्षमा मागून त्यांचेजवळ राहीन. मला आतां कोणाचीही गरज नाहीं. तुला वाटेल तसं कर. तुझ्या नादानं मी आपल्या पायावर घोंडा पाडून घेतला आणि कृष्णरावाची हेळसांड केली. अग ज्या शकता, क्रिया कृष्णरावाचरो- बर केल्यास त्या तुला सुख लागूं देतील का? ईश्वर कांहीं लांब नाहीं. त्याच्या घरी न्याय खरा आहे. खोट्याचा परिणाम कधीं चांगला झाला आहे का ? आतां जसं केलंस तसं भोग मी आ