पान:रमानाटक.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

र० – ( काही वेळानें शुद्धीवर येऊन ) आई ! आग आई ( जबाब देत नाहीं. पाहून ) काय आई इथं गोविंदराव व रामजी पाटील बसले होते, ते नाहींत. ( आंगावर दागिने नाहीत, असे पाहून ) आगबाई माझ्या अंगावरचे दागीनें कोणी काढले. ( घावरून सक्स उठविते ) अग ऊउ निजलीस काय माझ्या आंगावरचें दागीनें कुठं आहेत.
सकु० - मलाग काय माहित. (वाबरी होऊन इक डे तिकडे पाहू लागते.
र० - आतां कपाळ पहा तुझं, तें मेले लुच्चे इथं होतें, त्यानीच हे काम केलं त्यांच्या शिवाय कांहीं दा- गिने गेले नाहीत,
सकु० – मी गेटावर जाऊन शिपायाला घेऊन येते.
र० - जा आतां ओरडायला त्यांचें भोवती आधी सांगत होतें, या मेल्यांची संगत नको. हे ल आहेत केव्हां काय करतील. याचा नेम नाहीं. तूं याना घरांत आणू नको पण ऐकावं कुणी, तुला पैशाची हांव सुटली होती. घे आतां हवा तित- का पैसा माझा जिवलग कृष्णराव घालवून दिलास आणखी पैसाही बोळवून बसलीस आतां बरं झालं किनई ( विचार करून ) अहाहा कृष्णराव या जगांत आपल्या प्रेमाची बरोबरी करणार कोणी नाहीं. मी महा चंडाळीण, महापातकी. महाकु- लटा, अशी आईच्या नादानं होऊन निष्कलंक आणि गंगाजला प्रमाणं स्वच्छ अशा अंतःकरणास