पान:रमानाटक.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

स० - कांहो गोविंदराव, तिला जर नसेल घ्यायची तर उगीच कशाला देतां? तुझीं आपले ध्या
. गो० - आमच्या मर्जीकरितां थोडी तरी घेतली पाहिजे आणखी तुझींही थोडी घ्या.
स० – भलताच हट्ट कशाला पाहिजे ?
गो०- तें कांही आपण ऐकणार नाहीं.
स० – रमा, घे त्याच्या मर्जीकरितां थोडी, कोणाचंही मन मोडूं नये. ( इतक्यांत रामजी पाटील बाटली घे- ऊन येतो.
गो० – कांहो मिळाली कां?
रा० - हो, घेऊन आलो.
गो॰— आण तर. ( बाटली घेऊन त्यांतून एक गलास ओतून सकूस देतो, नंतर रमेस देऊन ते दोघेही पितात. )
र० – आईग, मला किनीं भोंड आल्यासारखं होतें.
स० - गोविंदराव तिला आतां पडूंद्या जरा.
गो० – चरें तर, रमा? तूं निज जरा, ( कांहीं वेळानें सकूसही गुंगी येऊन तीही बेशुद्ध होऊन पडते. )
रा० – गोविंदराव, या दोबी जणी बेशुद्ध होऊन पड ल्या. आतां हरकत नाहीं.
गो० – अरे, इतका खटाटोप केला कशाला तर! काढ अंगावरचे दानिने (असे बोलून सर्व दागिने घेवून) चला आतां कांहीं होवो, अगे चांडाळणी आमचे पैसे घेवून दुसऱ्यावर प्रिती काय ? बैस आतां ओ रडत. (असे बोलून दोर्घे निघून जातात. )