पान:रमानाटक.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक

घटकाभर मनुष्य पडलं तर देखील कटकट आहेच.
गो०-- कां ? जिवाला बरें नाहीं वाटतें ?
र० - - माझं डोकं दुखतं ह्मणून मी निजलें होतें.
गो०-- मग आमच्याबरोबर बोलायचें नाहीं कां ?
र० - माझ्या जिवाला वरं नाहीं, तुझीं कांहीं आतां मजबरोबर बोलू नका.
गो०-- आज तुमच्या जिवाकरितां आह्मी एक विचार केला आहे. आणि तुझी जर असे कराल तर कसे होईल ?
र० -- कसला विचार केला ?
गो०- - बरेच दिवस झाले, माझ्या मनाला गटलें कीं दारू प्यावी परंतु तसा योगायोगच येईना, हणून आज बेत केला आहे. आणि रामजीपाटील बाटली आणण्याकरितां गेला आहे.
र० - - हाच कां तो विचार ? मी साफ सांगतें मी कांही घेणार नाहीं.
गो०- हे काय बरें ? आमच्याकरितां ही गोष्ट केली पाहिजे.
र० - मी करणार नाहीं. (आईस हांक मारते ) आई, हे पाहिलेस कां, उगीच मला भलताच आग्रह करतात.
गो० – त्यांना काय सांगतेस? ( सकुचाई येते)
स० – कायग काय आहे ?
गो० – हे पहा मला दारू पिण्याचा आग्रह करितात.