पान:रमानाटक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

आठवण झाली. गोविंदरावानी एकदां मला सांगितले होते की एका सावकाराला कारकुन ठेवा. यचा आहे. तर त्यालाच सांगावें की जमत अ सल्यास मी राहतों. मात्र पगाराबद्दल उरांव आधीं केला पाहिजे. थोडा पगार मिळत असला तर काय उपयोग निदान पंधराच्यावर मिळाला पाहि जें. ( अशा विचारांत आहे इतक्यांत बळवंतराव येतो ) या वळवंतराव.परवां बळ० – बसा वसा तुम्ही. उठता कशाला ?
कृष्णा० – या या असे गादीशी बसा. (असे बोलून त्यास गादीशीं टेंकून बसवितो.)
वळ० -कां काय चालले आहे ?
कृष्णा० – कांहीं नाहीं. आतां बाहेरून फिरून आ लो आणि सहज बसलो होतो.
वळ० - फारसे विचारांत निमग्न होतां ?
कृष्णा० - विचार कसला करायचा !
बळ० – बरे ते असो. मी आज काही विचारणार आहे.
कृष्णा० – काय विचारणार ते विचार.
बळ० -तुला राग तर येणार नाहीं ना? नाहीं तर वि नाकारण स्नेहांत अंतर नको.
कृष्णा० – तें कांहीं नाहीं, यांत राग कसला? एकमेकां नीं एकमेकांस बऱ्यावाईट गोष्टी समजविल्या पाहि जेत. नाहीं तर मग स्नेहधर्म, काय !
बळ० – अरे, आतांशीं तूं नोकरी करित नाहींस, किंवा उद्योग करित नाहीस. दोन वेळां जेवून स्वस्थ कि-