पान:रमानाटक.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
रमानाटक.

गो०-तूं जर साह्य होशील तर हिला सफई बुडवितों.
रा० – मी अगदी तुझ्या अर्ध्या वचनांत आहे पण हिची खोड मोडल्यावांचून मला बरे वाटणार नाही.
गो० -- असे करूं की आज आपण इच्याशी गोड बोलून हिला आणि हिच्या आईला खूप दारू पाजूं; ह्मणजे त्यांना कधीं सवय नसल्यामुळे बेशुद्ध होतील. मग आपण सर्व दागिने काढून घेऊन निघून जाऊं.
रा०-आणि तिनें फिर्याद केली तर ?
गो० – अरे त्याला कोण भितो ! चार महिने बाहेर गांवी जाऊन रहावें ह्मणजे झाले.त्यांतून काम- दार लोकांची माझी ओळख आहेच.ही लबाड आहे. व आमच्यावर खोटें निमित्य घेते ह्मणून ठरवून आपण मोकळे होऊं.
रा० – हो गड्या, ही युक्ति फार चांगली आहे.
गो०- तूं माझ्या ह्मणण्याप्रमाणे हो ह्मणत जा, ह्मणजें मी पहा तिला आज कसा मोहून टाकतों. (वि- चार करून ) बरें तूं जा, आणखी एक दारूची वाटली घेऊन ये.
रा० – ठीक आहे. ( निवून जातो. )
गो० – ( रमा जवळ येऊन) कां रमाजी, आज फारशी झप लागली ? ( जागी होत नाहीं है पाहून तिला उठवून बसवितो ) उठा तर खरें, भलत्याच वेळी का झोप घ्यावी ?
र० – ( रागानें दूर बसून ) कोण मेला हा त्रास,