पान:रमानाटक.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

६३

गोट्या पाहून जीव त्रासून जातो. गोविंदराव तर दुसरी माणसं माझे घरी आणून बसवितो आणि आपण आपल्या घरी जातो. यांत त्याला लोक नांव ठेवतील याची लाजच वाटत नाही.( इतक्यांत तिला झोप लागते तो गोविंदराव व रामजी पाटील येऊन आपसांत विचार करतात. )
गो० – अरे, या रांडेला इतके पैसे दिले, तरी आप- ल्याशी चांगल्या रीतीने वागत नाही आणि जेव्हां पहावें तेव्हां त्या कृष्णरावाबद्दल मोठी शीफारस सांगत असते.
रा० – याच गोष्टीचा मला फार राग येतो पण काय करावें ? इलाज चालत नाहीं.
गो०- काय करावे ? माझ्या मनांत फार आहे की इला चांगला हात दाखवावा. त्याशिवाय ही ठिकाणी येणार नाहीं.
रा० – आपल्या तर मनांतून ही अगदी उतरली. तिच्या घरी जावेंसें सुद्धां वाटत नाहीं. अरे, माझ्या जवळचे सर्व सोन्याचे दागिने गेले, घर विकलें, बा- जारांत लोकांचें देणें झालें, इतकेंही असून मला जेवणाची पंचाईत आली. तर तूं जसें सां- गशील तसा मी वागेन, पण हिला चांगली अद्दल घडली पाहिजे.
गो०- मला एक विचार सुचला आहे. परंतु तो फार चमत्कारिक आहे.
रा० — तो कोणता ?