पान:रमानाटक.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
रमानाटक
प्रवेश १४.
रमा- सकु - रामजी पाटील व गोविंदराव.

र० – (मनार्शी) मनाला हौस असल्यावांचून कोण- तीच गोष्ट होत नाहीं. पैशाकारतां मी आईच्या ह्मणण्याप्रमाणं वागूं लागलें. तो गोविंदराव जेव्हां तेव्हां येऊन माझी आर्जव करितो, ह्मणून त्याच्या तोंडापुरतं बोलावं लागतं कीं तुजवर माझं फार प्रेम आहे. परंतु कृष्णरावांच्या नखाची सुद्धां सर येणार नाहीं. गोविंदराव लोकांच्याजवळून पैसे मिळवून देतो, मध्यस्थी करतो ह्मणून त्याच्याशी गोड बोलायचं, परंतु त्याला त्या गोष्टीची लज्जाच वाटत नाहीं. थोर घराण्यांतील मनुष्याला अशी मध्यस्थी करणं व माझ्याबद्दल दुसऱ्याला पट्टी करून देणं मोठं वाईट आहे. ज्याला अभिमान नाहीं तो पुरुषच नव्हे. माझा कृष्णराव खरा. त्याला कोणाकडं पाहिलेलं देखिल खपत नव्हतं आणि मी एक शब्द बोलतांच इतके दिवस झाले, तरी माझं तोंड पाहिलं नाहीं. मी दोन चार पत्रं पाठ- विली; लोकांबरोबर निरोपही पाठविले, परंतु इथं येणं मला बरं दिसत नाहीं ह्मणून एकदां जवाब आला त्यावर पत्र नाहीं. मीच दुष्ट ! आईच्या नादाला लागून त्या जिवलगाला घालिवलं. मा. झ्या हातचा हिरा जाऊन या मेल्या एक एक गार-