पान:रमानाटक.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

६१

त्या सौख्याचा हास होऊन अखेर तिनेही हातचे सोडलें. त्यामुळे मध्येच दोडक्यासारखा लोंचत रा- हिलों. आतां नाहीं घरदार आणखी नाहीं स्त्री. एकून या स्त्रियांच्या बाह्य स्वरूपावर भुलून जो मनुष्य विचार केल्यावांचून यांच्याशी स्नेह करतो तो असाच फसणार. ( विचार करून ) अरेरे! मी किती विचारी! किती पापभीरू ! किती शहणा! किती लोकमान्य! असा असून अखेर मला जगांत तोंड दाखविण्यास सुद्धां जागा राहिली ना- हीं. घरीं जावें तर लोक निंदा करतील, ( वि- चार करून ) देवा, मी केलेल्या सर्व अपराधांची तुझ्या जवळ क्षमा मांगतों, आणि येथून पुढे असल्या छंदाची मला बुद्धि देऊं नकोस. आतां का- खबरें करावें ? ( कांही वेळ स्तब्ध राहून) काय मी वेडा तर नव्हे ? अशा दुष्ट रांडेकरितां आपल्या जिवाला त्रास काय ह्मणून करून घ्यावा ? आप- ला जीव सुखी असला तर अशा शेकडो रांडा मि ळतील. धर्म सोडून तिच्या हातचें जेवू लागलों तर सारांश पहातां जो ह्मणून रांडेच्या नादाला लागला तो बाटल्यावांचून राहिलाच नाही. तेव्हां तोही आपल्याला विशेष दोष मानून उपयोगी नाहीं. असो, आतां या देशांत रहाण्यापेक्षां रत्ना- गीरी मुक्कामी जाऊन कांहीं नोकरी करून रहावें हेच उत्तम. ( असे बोलून निघून जातो. )