पान:रमानाटक.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
रमानाटक
प्रवेश १३.
कृष्णाजीपंत.

कृष्णाजीपंत - ( अंगांत फाटके कपडे घातलेला अ सा प्रवेश करतो.) अरेरे ! काय ही माझी स्थिती ! आजपर्यंत माझे चैनीत दिवस गेले. अंगावर कपडे मी मनासारखे वापरले. कधीं मला दुःख माहि- त नाहीं, परंतु या रांडेच्या नादाला लागल्यापासून अगदीं वेडा होऊन अखेर अंगावर कपडासुद्धां घड नाहीं ना ? हा स्त्रोछंद फार कठीण आहे. जो मनुष्य या नादांत पंडतो तो सफई नाश पाव- तो. अहाहा! या रांडेने मला किती माया ला- वून सर्वस्वी स्वाधीन करून घेऊन अखेर अळवावर- ल्या पाण्याप्रमाणे प्रेमाचा प्रकार केला, ज्या वेळेस प्रथम माझ्याशी हिनें स्नेह केला, त्या वेळेस किती क्रिया व शकता केल्या. मी नको ह्मणत अ- मतां त्या म्हातारीनें आणि हिनें नाहीं नाहीं त्याप्रकारें माझी समजूत करून मला वचनांत गो- वून घेतले. त्यामुळे मी आप्तवर्गाच्या विचारा. शिवाय वागलों. इष्टमित्रांचा स्नेह तोडून त्यांशी वांकडा झालो. अचूने खाली आलो. ब्राह्मणधर्म सोडून मद्यमांस सेवन करू लागलो. नित्य ति च्या हातचें जेवण आणि ते एका ताटांत; मग काय विचारतां! जातीधर्माकडे लक्ष द्यावें कोणी ? परंतु