पान:रमानाटक.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

५९

हीं. मग लोकांकडं पाहणं कुठचं ? इतका तर म ला धाक होता, आणि आजपर्यंत मीही त्यांच्या मर्जीप्रमाणं वागलें. हजार रुपयांची थैली त्या ना- नाशेटानं मजपुढं ठेवली होती, परंतु त्याची सुद्धां आशा केली नाहीं, आणि ह्मण अहे की "अ ती तिथं माती " तसं झालं. या आई करितां मी त्यांना असं निक्षुन बोललें. ( विचार करून ) माझे शब्द ऐकून त्यांच्या मनाची कायग बाई स्थिती झाली असेल! असो, देवा-जिथं ते राहतील तिथं त्यांना सुखी ठेव. पैशाकरितां ह्मणून वा- ईट काम करायचं, नाहीतर मनासारखं सुख कृ- प्णरावावांचून मला कुठंच मिळणार नाहीं. मी पक्कं समजतें. ( इतक्यांत घरांतून सकूबाई हाक मारते ह्मणून रमा निघून जाते. )