पान:रमानाटक.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
रमानाटक.

नकोस. तुझ्या साठी मी किती बरें प्रयत्न करता ! परंतु काय करूं ?
र० – ही कटकट मला नका सांगू तुझी.
कृ० -- (डोळ्यांत पाणी आणून) ठीक आहे; तर मी- च येथून जातो. आतां ज्यापेक्षां तुझें मन इतकें बि- घडले, त्यापेक्षां येथें रहाणें उपयोगी नाहीं.
र० - मी कांहीं जा ह्मणत नाहीं. तुमच्यावर माझा जीव आहे तो आहेच. तुझाला पैसा मिळत नाहीं ह्मणून ह्मटलं; यांत तुह्माला वाईट वाटूं नये. मला जर परवानगी दिलीत, तर मी तुह्मांजवळ एक पैसा ही मागणार नाहीं आणखी पाहिजे तर तुझांला चै- नींत ठेवीन
कृ० --मेलों तर बेहत्तर! परंतु अशी गोष्ट मला सहन होणार नाहीं; आणखी आतां मला तुझा संबंधही नको. हीच तुझी माझी अखेरची भेट.
र० -- असं काय करतां? मी कांहीं बोभाटा होऊं दे •णार नाहीं. व तुमच्या नांवालाही बट्टा लावणार नाहीं.
कृ० – ( रागानें ) खबरदार पुनः असें बोलशील तर! मी तशा प्रकारचा मनुष्य नाहीं.मला काय क रायचे आहे ? तुझा माझा आजपासून संबंध सु- टला.तुला वाटेल तें कर.

( अर्से बोलून निघून जातों )

र० --काय रागीट स्वभाव असेल तो असो. कांहीं सहन व्हायचं नाहीं. नुसतं घरी कोणी आलं त री देखील मला लोकांच्या दृष्टीस पडूं दिलं ना-