पान:रमानाटक.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

५७

कृ० – असे वेड्यासारखे काय भलतेच बोलतेस !
र० – पाहिजे तें असो, मला पैसा पाहिजे.
कृ० - मजजवळ असून कां मी तुला देत नाहीं ?
र० – ( मोठ्यानें ) ह्मणूनच मी बाहेरून मिळवणार ?
कृ० – ( तिला जवळ घेण्यास जातो तो ती त्याला झिडकारून धक्का देते. ) अशी वेड्यासारखी भलतें- च काय बोलतेस ? तुला माझा कंटाळा आला वाटतें ?
र० - मला दागिने पाहिजेत. तुमच्या जवळ राहून काय मिळणार हे दिसतंच आहे.
कृ० – ( गहिवरून ) अशी ओरडूं नकोस; लोक ऐ- कतील तर काय ह्मणतील !
र० - (मोठ्यानें ) मला काय करायचं आहे ? तुझी पाळा हवी तर मिती मी साफ ऐकणार नाहीं. ( बाजूस जाऊन उभी राहते. )
कृ० – रमा, अर्से काय बरं करतेस? तूर्त माझे दिवस वाईट आहेत, जातील निघून. मी तुला सोडून दु- सन्याला कां पैसा देणार आहे ? ( तिला जवळ घेण्यास जातो. )
र० - (त्यास झिडकारून ) खबरदार माझ्या अंगा- ला हात लावाल तर! मी कांही तुमच्या जवळ रहा- णार नाही. आणि पुनः तुह्मी मला विचारूं नका.
कृ० – ( डोळ्यांत पाणी आणून) रमा, तुझ्या मी पा यां पड़तों, परंतु मजवर कृपा कर आणि अशी बोलू