पान:रमानाटक.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक
प्रवेश १२
रमा-कृष्णराव.

र० - आईनं सांगितलेली युक्ती बरी आहे. पण कृष्णरावाचा स्वभाव फार तापट आहे. ते कसे ऐकतील कोण जाणे. असो, आतां जनं होईल तसं होवो. आईला सोडून कांहीं उपयोग नाहीं. किती झालं तरी तीच आपल्या का ळजीची आहे. कृष्णराव तरी अखेर करणारा मनुष्य आहे; पण काय करील. त्याला पैसा नाहीं, त्यामुळे कसं वेड्यासारखं झालं आहे. देवा कृष्ण रावाला सोडावं असं माझ्या मनांत मुळीच नाहीं पण या आईच्या मर्जी करितां त्या निवलगाला सोडणं आलं. (इतक्यांत कृष्णराव येतो त्यास पा- हून उठून दूर उभी राहते. )
कृ० - कां दूरकां उभी राहिलीस ?
र० - गेला होतां त्या कामाचं काय झालं ?
कृ० – काय करावें कोठें चाकरीचे जमतच नाही.
र० – असं जन्मभर तुमचं न जमलं तर मला कां वि नाकारण दुःख देतां. मला दागदागिने नकोत कां?
कृ० – नशिवांत असले तर मिळतील. अशी काळ- जी कां करतेस ?
र० -- ते कांहीं नाहीं, मी आतां साफ ऐकायची ना- हीं. मला वाटेल तसं मी करोन.