पान:रमानाटक.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

५५

तर पाहिजे तें जरी केलं तरी काय होणार! कृष्ण- रावाची सर कांहीं दुसऱ्याला येणार नाहीं.
सकु -- करायची काय नुसती माया असून ? माझं जर ऐकशील तर फार चांगलं होईल. चार पैसे मिळून दागिने होतील. सगळं नीट हे ईल, अलिकड तुझ्या नादींही लोक बरेच आहेत. तेव्हां कृष्णरा- वाला सोडून दे म्हणजे बरं होईल. इतक्या धाकांत राहून कांही उपयोगी नाहीं.
र० -- त्यांच्या वांचून गडे मला कसं करमेल याची मोठी काळजी आहे.
स० -- अहाहा ! उद्यां चार माणसं येऊन पैसा मि ळू लागला, हाणजे न करमायला काय झालं ?
र० -- आईग, त्याणीं मागंच मला पुष्कळ प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, त्यांत बोलता बोलतां असं बो लले की जर तुझ्या हातून वाईट काम झालं, तर मी तुझा जीव घेईन आणि फांशी जाईन.
सकु -- जीव कांही वाटेवर पडला नाही. करायचं काय अशाची मनं संभाळून, राहिले तर राहातील, नाहीं तर जातील.
र० – एकाएकी असं बोलणं हाणजे मोठी पंचाई- तत्र आहे.
स० -अमूंदे. मग तुला त्याची युक्ती सांगन चल आपण देवाला जाऊं.
र० – चल तर. (असे बोलून निघून जातात.)