पान:रमानाटक.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
रमानाटक.

रमेच्या तोंडावरून हात फिरवून मुका घेतो,व तारेचा मुका घेऊन ) हिला संभाळ बरं नीट, मारूं बिरूं नकोस
र० – ( डोळ्यांत पाणी आणून ) जिवाला चैन नाही हाणून बाई मला फार वाईट वाटते.
ऋ० –– ( आलिंगन देऊन धोत्राने डोळे पुसून ) उगी, रडूं नकोस, आतां मी लौकरच येतो. (असे बोलून निवून जातो. )
र० – काय बाई, मजकरितां जिवाला त्रास होतो ! ( इतक्यांत सकू येते. )
सकु० --गेले कां कृष्णराव ?
र० -- हो आतांच गेले.
सङ्क्र० -- रमा, तुला किती बरं सांगावं. अग आपला नका पहायचा तें दिलं सोडून, आणखी उगीच त्या- च्या नादाला लागून काय उपयोग.
र० - कायग आई असे सांगतेस. हे चांगलं का?
मकु – अगबाई तूं आजून लहान आहेस, यांतलं तुला काय समजणार? हे दिवस निघून गेल्यावर मग का तुला पैसा मिळेल? ह्या वगांत तुझे ल्यायचे नेसायचे दिवस तर आंगावर चार चांगले दागिने नाहीत, नेसामला मोठी लुगडींही नाहीत. बरं, खा- ण्यापिण्याचं तरी सुख कुठं आहे? अग असं नादाला लागून उपयोगी नाही. अशानं तुझा शे- वट कसा होईल ?
•--आई नशिवांत असला तर पैसा मिळेल; नाहीं