पान:रमानाटक.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

५३

नाहीं, तूर्त आठ दिवसांची तुमची खाण्याची तज बोज घरांत आहे. तोपर्यंत मी जाऊन येतो. जमले कोठें तर बरेंच झालें.
र० --हो, आमची मात्र काळजी करा. पण आपल्या जिवाला कांहीं सुख नका लागूं देऊं. मी नाहीं जाऊं देणार बाहेर, नाहीं तर मी येतें बरोबर. मला तरी इथं काय करायचं आहे ?
कृ० - मुलगी लहान आहे तेव्हां तुला नेऊन कसे चालेल? तशांतून मी नोकरीकरितां फिरणार आणि तुला कोठें देवू ?
र० – जा गडे माझं कांहींच का ऐकायचं नाहीं ?
कृ० - वेडी आहेस, भलताच काय हट्ट धरतेस. आ जेवायचे आटोपले असले तर पहा, ह्मणजे आतां अकराचेच गाडीतून जातो.
र०- आतांच जायचं ?
कृ० - मग व्यर्थ बसून तरी काय करायचें आहे ?
र० - बोलावं कुणी. ( असे ह्मणून घरांत जाते. )
कृ० - प्रथम लोणावळ्यास जावे, कारण तेथें रेलवेचा मोठा कारखाना आहे. त्यांत वर्कशॉपमध्यें पेंटि- गची जागा मिळाल्यास फार चांगले होईल.
र० - (चाहेर येऊन ) चलतांना जेवायला ?
कृ० - चला. ( दोघे निवून जातात. पुनः बाहेर येऊम जाण्याची तयारी करतो. )
र० - लौकर परत यागडे. मला आतां करमणार नाही.
कृ० - चार पांच दिवसांनी परत येईन. ( असे ह्मणून