पान:रमानाटक.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

र० - (जवळ बसून.) आईनं घेतली आहे.
कृ० तूं काय करीत होतीस?
र० --कांहीं नाहीं, घरांतलं काम केलं.
कृ० -- माझा जीव तर फार त्रासून गेला.
र० -- असं त्रासून काय होतं? (गळां मिठी मारून) मीच मेठी पायगुणाची खोटी. माझ्या नशिबीं सु- खच नाहीं, सगळ्या गोष्टी मनासारख्या होऊन आतां उद्योगत्र कां नसावा. असो, तुह्मी गडे मना- ला वाईट वाटूं देऊं नका. जसं चालेल तसं खरं. मी तुमच्याजवळ कांहीएक मागत नाही. दैवांत असेल तर सर्व मिळेल, पण इकड जिवाला जो त्रास होतो तो पाहून (डोळ्यांत पाणी आणू- न) मला फार वाईट वाटतें.
कृ० -- ( तिला पोटाशी धरून) वाईट वाटून उपयो- ग काय! ईश्वर ठेवील तसे राहिले पाहिजे.
र० -- माझ्याकरितां या जिवाची किती हालअपेष्टा होते, याचं मला दुःख होतं.
कृ० - - वेडी आहेस. अर्मे करून कसे चालेल ! आतां मी एक विचार काढला आहे.
र० -- कोणता ?
कृ० -- चार दिवस बाहेरगांवीं जाऊन नोकरीची तज- वीज करून येतों येथें तर आपला उपाय हरला.
र० - बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे हाल, त्यांतून पैसा जवळ नाहीं; मग काय करणार तुह्मी ?
कृ० -- कांहीं होवो, परंतु आतां स्वस्थ बसून उपयोग