पान:रमानाटक.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.
प्रवेश ११.
कृष्णराव - रमा-सखु.

कृ० – काय ह्या दैवाची गती चमत्कारिक आहे! इतके प्रयत्न करतों परंतु कोठें चाकरीचा थांग लागत नाही; मी किती अभिमानी मनुष्य! कोणाची आर्जव करणे मला ठाऊक नाही, परंतु हल्ली माझी अकल अगदीं गुंग होऊन गेली. ज्याचें तोंड पहाण्याचा प्रसंग कधी येणारा नव्हे, त्यांचे पाय धरावे लाग- तात. रोज उठून पैशासाठी लोकांचें आर्जव करावें लागतें. माझे वापरण्याचे चांगले कपडे ते सुद्धां गहाण पडले. स्नेहासोक्त्यांत तोंड दाखविण्याला जागा नाहीं. बरें, हिला सोडून द्यावी तर तिनें आपल्याला अजून कधींन कोणत्या गोष्टीबद्दल इट घेऊन सांगितलें नाहीं तेव्हां तिचा तरी वि श्वासघात काय ह्मणून करावा. माझ्यावर तिचे प्रेम फार आहे, नाहीं तर अशा दुःखांत इतक्या हुक- मांत कोण राहणार ! आतां तिच्या आईचा स्व. भाव फार वाईट आहे; तीन काय करील कोण जाणे. परंतु रमा माओविय कांहीं मनांत आण- णार नाही. जिने माझ्याकरितां दागिन्यांची सुद्धां आशा ठेवली नाही; आणि वारंवार माझ्या मना- ला धीर देते. ( असा विचारांत असतां रमा येते. ) तारा कोठे आहे ?