पान:रमानाटक.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
रमानाटक.
( असे बोलून रागानें निवून जाते. )

सकु – काय करावं ! ही पोर तर ऐकत नाहीं; आणि दिवस तर निवून चालले. असो, आपण तरी इत- क्यांतच कशाला ज्यास्त बोला. हलकेहलके इच्या मनाप्रमाणं वागून हिला वळाली पाहिजे. ( तारा रडते आहे अर्से ऐकून ) अग बाई! मुलमी उठली वाटतं.

( निवून जाते. )