पान:रमानाटक.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

तुझ्याजवळ पैसा नसंदेहाणने कसं होईल ते पहा. भी आहे तोपर्यंत कांही हरकत नाही. पण मा- झ्या मार्ग तुझे चांगले व्हावे हाणून मी सांगते. करायचं काय यांच्याजवळ राहून ?
र० – ( रागानें ) तुला बोलायला तरी कांही वाटतं कां ? तूंचना त्यांना शाथ दिलीप? आणखी इ- तक्यांत फिरलीस! ज्यानीं माझ्याकरितां घरदार सोडलं त्यांना मी असे कधी सांगणार नाहीं. जसं होणार असेल त होईल. त्यांच्या जिवाला सुग्ख तर मला सुख, पैमा असून काय त्याला आग लावाय- ची! ते आहेत तर माझा पैसाच आहे. मला काही नको. तुला वाटेल तसं कर; त्यांना कांहीं मी सोडणार नाही माझे कांहीं होवो. तूं आपल्या अकलेनंच त्या मेल्याच्या पदरी बांधली होतीस तर खरी; एक दिवस देखील मला सुख लागलं नाही. तसंच तुझं ऐकून पुढं दुःख भोगायचं की नई? त्यापेक्षां कृष्णरावाचा जीव मजवर आहे इतकं च मला पुरे, त्याची बरोबरी कोण करणार! परवां आह्मी धुळ्यास गेलो होतो तर दीड महिन्यांत म ला कधी त्यांनी इतकंसुदां दुःख वाटूं दिलं नाहीं. जी जिन्नस मी मागितली ती मला दिली.घट- काभर मला सोडून कुठ गेले नाहीत.असं त्या पुरुषाचं प्रेम मजवर असून त्याला दगा देऊं ? मग ईश्वर माझं चांगलं करील का? खत्ररदार, आज बो- ललीस तर बोललीस. पुनः जर असं सांगशील तर माझ्याजवळ तुला मी ठेवणार नाहीं.