पान:रमानाटक.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

४९

प्रवेश १०.
गोविंदराव व रामजीपाटील.

रा० - कां गोविंदराव, कसे काय आहे! आतांशे तुही कोठें फारसे दिसत नाहीं. काय कामांत गुंतलां आहांत ?
मो०- मी गांवाला गेलो होतो, परवांचे दिवशी आलो.
रा० -- असे काय ? हे नव्हते मला ठाऊक.
गो०- बरें कांहीं नवी जुनी खबर !
रा० --हो, बरी आठवण झाली, तुझाला एक गोष्ट सांगणार आहे.
गो० -- कशाबद्दल ?
रा०-- जुळलं तर फार मजा आहे.
गो०-- सांगाल तर खरें.
रा० -- शनवारांत महादेवाच्या देवळाजवळ तो कृ- प्णराव सोलापूरकर राहातो की नाही, त्याचें पात्र फार उत्तम आहे. पण काय करावें.
गो० -- कां बरें ?
रा० - - हा घाट जमतो कसा ?
गो० -- अरे हो, तिची आई आहेना पण ?
रा० -- आहे खरी, परंतु बोलावें कोणी? पाहूं गेलें तर तूर्त कृष्णरावाची दशाच आहे.
गो०- मग हो काय हरकत, तिच्या आईला पैशाची लालुन दाखवावी म्हणजे झालें.