पान:रमानाटक.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
रमानाटक

र० ते तरी काय करतील? घरी खायला नाहीं ह्याची काळजी करावी की नोकरी पहात फिरावं ? तरी कधी घरी बसत नाहीत. ते जेव्हां तव्हां ह्मगतात, प्रयत्न करत परंतु नशीब उदयाला येत नाहीं; त्याला मी काय करूं? " बरं, गूण थोडे का आहेत अंगांत सगळे लोक चांगले ह्मण- तात, पण नशीबाला काय करावं?त्यांतून प्र यत्न करतातच. हे दिवस वाईट आहेत, उद्यां निवून जातील.
स० - अग, त्यांचे दिवस जर वाईट आहेत तर आपण आपलं नुकसान कां करून घ्यायचं असंच नाही लावून गोडीनंच सांगावं की माझं कां नुक- सान करितां ? हे दिवस निवून गेल्यावर मला कोणी पैसा देईल कां ? तुमच्याजवळूनही नाहीं. आगखी बाहेरूनही मिळवू देत नाहीं, तर हे कांही चांगले नाही. इतकं करून जर न ऐकतील तर साफ सांगावं स्नेह तुटला ह्मणून काय हरकत आहे ? पैसा असला तर साच्या गोष्टी, नाही तर कोण विचारतो !!
र० - आई, काय हे भलतंच सांगतेस ! असं एकाएकी कसं बोलवेल ? मी त्यांना वचन दिलं आहे. तेव्हां है कांही मला बरं दिसत नाहीं.
स० - त्याला काय झालं ! अर्शी वचनं किती वेळां दे- तात आणखी खोटी करतात. वचन ह्मणजे काय पैसा असला तर, नाहीं तर कोण विचारतो! उद्यां