पान:रमानाटक.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

४५

र० - कांहीं नाहीं उगीच बसले.
सकु - ताराबापु निजली का ?
र० - मघांच पाळण्यांत निजविली.
सकु – कृष्णराव कुठ गेले ?
र० - आतांच गेले बाहेर.
सकु - (जवळ जाऊन बसते.) अग कृष्णराव उद्यो- ग करित नाहीत, अशानं चालेल कसं !
र० – तर कायग आई करायचं !
सकु -- हो, आतां मला विचार! तुला सांगितलं नव्हतं कोणची गोष्ट करायची ती विचार पाहून करावी. पण माझं ऐकतो कोण? मला बाई हा त्रास स- हन होत नाही. किती मेलं दुःख काढावं. आ- गींतून निघून फुपाट्यांत पडल्याची गत झाली.
र० - आई. असंग काय करतेस ? दोन दिवस दुःख पडलं म्हणून काय झालं? उद्यां एखादी नोकरी लागली ह्मणजे सगळं नीट होईल. मला त्यांच्या शरीराकडे पाहून फार वाईट वाटतं. ते आपल्या घरी होते तेव्हां कसे आनंदांत होते, आणखी इथं माझ्याकरितां ना त्यांना दुःख नाही तर इतक्या हाल अपेष्टा करायची काय त्यांनां गरज होती ?
स० – पहा बाई. मी तरी किती सांगूं ! या वयांत दुःखाक नं पैसा मिळवून ह्यातारपणाकरितां ठे- वायचा.मग हे दिवस असे गेल्यावर पुढं दुःख भोगायचं, हे मला बरं दिसत नाहीं.