पान:रमानाटक.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
रमानाटक.

काळजी ठेवणार, सगळं परस्वाधीन, ह्मणून मी म्हटलं वरी जेवलांत म्हणजे बरं.
कृ० – तुझ्या हट्टाकरितां असें करावें लागले.
र०-लोकांच्या बायका नवन्या बरोबर एका ताटांत बसून जेवतांना पाहिल्या ह्मणून मलाही वाटलं, याकरितां मी असं केलं. मला नकोकां तें सुख ? त्यांतून आतां दोन दिवसांची बाबद नव्हे रेशमा- ची गांठ आहे.
कृ० – नाहीं म्हणतो कोण? परंतु घरीं समजले तर पंचाईत होईल; आणि येथेंही लोक नांवें ठेवतील. र० – कांहीं नाहीं घरीं सांगतं कोण ? आणखी इथं लोक थोडेकां असतील असं करणारे ? ( असे बोलून दोघेजण उठून एका ताटांत जेवायला बस- तांत. आणि परस्परास घास देतांत अशा आनंदांत. )
र० - माझ्या गडे मनांत फार हौस होती, ह्मणून मी हट्ट घेतला.
कृ० – असो झाले ते चांगलेच झाले. (इतक्यांत सकुचाई येतं )
र० – आई कितीग उशीर लावलास.
कृ० – अग पण जावून यायला नकोका ?
र० - तारा पहा केव्हां पासून रडते ती.
सकु--आण तिला मी घेते. तूं ही भाजी चिरून घे, आणि स्वैपाककर. कृष्णरावाना भुक लागली अ