पान:रमानाटक.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

४३

सेल त्यांचं रात्री कांही जेवण नीट झालं नाही. ( मुलगीस घेतें. )
कृ०– होबूंद्या सावकास. मी आतां जेवलो. – होबूंद्या सावकास. मी आतां जेवलो.
सकु– (कृष्णरावास) चाकरीचं कांही जमलंकां कुठे ?
कृ० - आद्याप कोठे जुळत नाहीं काय करावें. मी मोठा फिकिरींत पडलो आहे कांहीं उपाय चालत नाही.
सकु – तर काय हो ! मनुष्याला उद्योग नसला ह्म- णजे गोडलागत नाही आणि खालं आन्न सुद्धां अंगी लागत नाहीं. तुझीच जेव्हां मुंबईत उद्योग करित होतां तेव्हां सुख लागून शरिर कसं होतं, तेच इथं आल्यापासून उतरलं.
कृ०- ही काळजी मोठी वाईट आहे. ( उठून ) बरें मी जरा बाहेर जावून येतो.
र० - उगीच कशाला आतां बाहेर जायचं ?
सकु – जाबूंदे कांहीं काम असलं तर? असं बाहेर जायच्या वेळेला माणसाला हटकण लावूनये.
कृ० -मी लौकरच येतों. ( निवून जातो )
सकु – चल आतां मी तारेला संभाळतें तू स्वैपाक कर लौकर. ( दोधी निघून जातात. )