पान:रमानाटक.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

४१

र० - बाजारांत भाजी आणायला गेली आहे.
कृ० – मग येईल आतां, घटकाभरसुद्धां तुला पो- रीला संभाळवत नाहीं? ( रमा हंसूं लागते ) हंस- लें म्हणजे झालें.
र० – काय करूं तर ? ( पुनः त्याचे मांडीवर दे- ऊन त्याच्या गळां मिठी मारून) अशी जवळ घे तली तर काय झालं ?
कृ० – मला बाहेर जायचें आहे. तर चल आपण जेवूं.
र० – काय जेव्हा तेव्हां बाहेर जातां ? घटकाभर सुद्धां मजजवळ बसायचं नाही. मला गडे ना- ही करमत, हे काय बरें असं आतां काय करायचं आहे बाहेर जाऊन ?
कृ०– घरी बसून काय करूं उद्योग नकोका बघायला.
र०- लागेल मेला ! जसं व्हायचं असेल तसं होईल.
कृ०- अर्से बसून कसे चालेल ?
र० – मग काय करणार तर ? इथं आल्यापासून तुह्मी शरिरानं फार खराब झालांत, हाडं दिसायला लागलीं, मला गडे वाईट वाटतं. घरीं होतां तेव्हां खाण्यापिण्याचा बेत चांगला होता.
कृ० – आणि येथें काय कमी आहे ?
र० – नाहीं तर काय ! आमच्या हातचं जेवण ! काय मराठी चालीचं !
कृ० – असें तर खरें.
र० – मला तरी असंच वाटलं, की खाणावळीत कोण