पान:रमानाटक.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
रमानाटक.
प्रवेश ८.
कृष्णराव - रमा- सकु.

कृ० – ( मुलीस मांडीवर घेऊन बसला असतां मना- शीं ) काय करावें? आज दीड वर्ष होत आले, मी नोकरीचा प्रयत्न करतों परंतु कोठें ठिकाण लागत नाहीं. जवळ पैसे होते तेही खर्च झाले. शिवा- य दोन चार जिनसाही गहाण ठेविल्या. आतां हा खर्च चालावा कोणत्या रीतीने ह्याची मला मोठी काळजी पडली, ईश्वरकृपेनें मूल झालें, याच्या अं गावर चार हौसेच्या जिनसा असाव्यात तर घरांत खाण्याचीच पंचाईत, मग त्या व्हाव्यात कशा ! देवा, आतां मला सर्व सुख आहे; परंतु पैसा नसल्या- मुळे त्या सुखाबद्दल उलट दुप्पट दुःख होत आहे. असो, हेही दिवस जातील. परवां बाळंतपणाकरि- तां घरींहून शंभर रुपये आणले, ह्मणून बरें झालें. नाहीं तर फार पंचाईत पडली असती. ( इतक्यांत मुलगी रडूं लागते, ह्मणून रमेस हांक मारतो ) रमा, ही तारा रडूं लागली हिला घे.
र० – ( जवळ येवून तिला घेऊन ) आज किनई स- काळपासून अशीच रडते, काय करूं ! आई केव्हां येते कोण जाणे.
कृ० – मामी कोठें गेल्या ?