पान:रमानाटक.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक

.३९

र० - - (दुःखार्ने ) आपल्यापुढे मी काय बोलूं ?
रु० - - तूं काळजी करूं नकोस फार दिवस तुला इथें ठेवणार नाहीं. आतांच बरोबर नेली असती, परंतु लोक नांवें ठेवतील व स्टेशनावर पोचवायला दादा आले ह्मणजे पंचाईत होईल, याकरितां तूर्त नेत नाहीं, तिकडे तरी जुळलें तर बरें, नाहीं तर मी ताबडतोच परत येईन. मग येथेंच राहूं, जे होईल तें होवो.
र० -- जसं तुमच्या मनास येईल तसं करा. परंतु मला फार दिवस इथं ठेवू नका. मला किनई आतां तु- मच्यावांचून एक घटकाभर सुद्धां चैन पडत नाहीं. तुझी नोकरीवर जातां आणि दोनप्रहरीं घरीं लौ- कर जर आला नाहीत तर मी खिडकींत वाट प हात बसत असतें आणखी जिवाला हुरहुर वाटते.
कृ० -- असो. अर्धी नोकरीवरून रजा मिळाली पा- हिजे. तर मी जातों. आतां (घड्याळ पाहून) दोन वाजून गेल्या. आज फार काम आहे.
र० -- जाल आतां. बसानात थोडा वेळ.
ना० – नको. उगीच धनी रागें भरेल. त्यांत काय अर्थ आहे !
र० -- संध्याकाळीं लौकर घरी या.
ना० --बरें आहे. ( असे बोलून परस्परांचें चुंबन घेऊन जातात. )