पान:रमानाटक.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८

रमानाटक.

कृ० -- तसे तर होणारच नाही, परंतु येथें राह- ण्यापेक्षां वाहेर गांवीं कोठें तरी जावें असे वाटते. हाणजे काळजी नाहीं.
र०– जसं तुमच्या विचारास येईल तसं करा, मी तर हे पाय सोडणार नाहीं. जिकड तुझी तिक- ड. मी येणार.
कृ० – नाहीं ह्मणतो कोण ?
र०– बरं कोणत्या गांवाला जाणार ?
कृ-नगरास जावें. कारण तेथें उद्योगधंदा चांग- ला चालेल.
र० - घराहून तुह्माला जाऊं देतील का पण ?
कृ० – मी तूर्त पायानें अजारी आहे हें घरों सर्वांना माहीत आहे. तर आईला आणि दा- दांना सांगतों की मी चार दिवस हवा बदलण्या- साठी नगरास जातों ह्मणजे ते कांहीं बोलणार नाहीत. आणखी मी येथून अगोदर गेलों व तूं येथें राहिलीस ह्मणजे लोकांच्या मनांत फार संशयहा येणार नाहीं.
र० – अगचाई ! मग तुझी मला केव्हां न्याल ?
कृ० – मी पुढे जाऊन जागेची व माझ्या नोकरीची तजवीज करून आठ दहा दिवसांत तुला घेऊन जाईन.
र० - (खिन्न होते व खाली पहात स्तब्ध राहते.)
कृ० -- (तोंडांवर हात फिरवून हनवटी धरून) कां ? वाईट वाटले वाटतें ?