पान:रमानाटक.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.
प्रवेश ७.
कृष्णराव-रमा.

कृ० – काय चमत्कारिक प्रकार झाला. आतां आप ली ही गोष्ट उघडकीस येणार. आणि वरीं सम- जली ह्मणजे मोठी पंचाईत होईल. त्यांतून बळवंत- रावाला समजली ह्मणजे तो तर फार दूषण देईल. तर इथे राहून लोकांचें दूषण घेण्यपोक्षा बाहेर गांवीं कोठें तरी जावें हें उत्तम. आपल्याला ईश्व- रानें गुण दिला आहे त्यामुळे कांही अडचण पड- णार नाहीं. (इतक्यांत रमा येते) ये बैस.
र० -- आज तोंड कां अगदी उतरल्यासारखं दिसतं?
कृ० - - तुझ्याबद्दल हकिकत सर्वांना समजली त्यामुळे वाईट वाटते.
र० -- समजली ह्मणून काय झालं. मी कांहीं भीत नाहीं. आणखी तुह्मालाही भिण्याचं कारण नाहीं.
रु० -- भीती ह्मणून इतकीच की तुझा नवरा फिर्याद वगैरे करील आणि विनाकारण सरकार दरबारपर्यंत नांवाचा बोभाटा होईल. त्यांतून घरीं दादा रागें भरतील हीच काळजी.
र० - - तो काय मेला फिर्याद करतो! आणखी केलीच तर जबाव देण्याला माझी आई आणि मी तयार आहोत, आपल्यापर्यंत येऊं देणार नाहीं. परंतु मजवरचा लोभ आतां कमी करूं नका.