पान:रमानाटक.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

३५

ल्या मनानं तुह्माला पसंत केलं तर तुमच्या हा तानं मुठभर माती माझ्या अंगावर पडूंद्या, व ति चा शेवट चांगला करा. तुझी सुज्ञ आहांत तेव्हां जास्त काय सांगू !
कृ० – मी कांहीं नाकबुल नाहीं. परंतु-
स०- असे विचारांत पडूं नका. हिच्याच रक्ताची शपथ घेऊन सांगतें कीं तुमच्या सांगण्याप्रमाणे मी चालेन. आणखी रमेबद्दल तरी असंच सांगतें की प्राण गेला तरी तिला वाईट वागू देणार नाही. हाच माझ्या ह्यातारपणाच्या बोलण्यावर विश्वा- स ठेवा.
कृ० – सखुबाई विचार करा. तुझी वडील माणसें अ- हांत ह्मणून तुमच्या शपथेवर विश्वास ठेवून मी ही गोष्ट कबूल करतों, मात्र अखेरीस मान कापूं नका.
स० – असं भलतंच काय ह्मणतां! वेळ आली तर र मेला अंतर देईन परंतु तुमच्यासाठी प्राण देईन. हीच माझ्या कुळाची आणि ईश्वराची शपथ आहे.
कृ० – ठीक आहे. आतां कांही काळजी नाहीं.
स० – मी जाऊं तर आतां घरीं ?
र० - जा तूं निज जा. ( सखु निवून जाते, नंतर कृ प्णरावाच्या गळ्यास मिठी मारून) ईश्वरानं चां- गलं केलं.
कृ० – पहा बरें रमा, नीट विचार कर.
र० - मला कांहीं सांगायला नको.