पान:रमानाटक.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
रमानाटक.

न मी स्वस्थ राहीन. ( रागानें निवून जातो; रमा व सकू कृष्णरावाजवळ येऊन बसतात.)
स० – ( तो चिंतातुर बसलेला पाहून) तुझी कां असे चिंतावल्यासारखे बसलांत? तो काय करणा- र आहे ?
कृ० --अहो विनाकारण भांडण ह्मणून वाईट वाटते.
र०-आतां काय वाईट वाटायचं. आतां तर मना- सारखं झालं. ( सकूच्या कानांत सांगते )
स० -- तुमचा माझा बोलण्याचा जरी हा पहिलाच प्रसंग आहे, तरी तुमची सर्व हकिगत हिनं मला सांगितली. काय करूं मला तरी हें बरं दिसतं का? परंतु ही एकुलती एक पोर, हिचं चांगलं असावं ह्मणून मी माझ्या जिंदगीची यांच्या पायीं धूळधाणी केली की दोघांनी आनंदांत रहावं, आणखी मी पहावं, परंतु त्या मूर्खाला शहाणपणच नाही त्याला मी काय करूं, आतां तिच्या मनास आलं तसं तिनं केलं.
कृ॰ – तें खरें परंतु फार विचार करावा लागतो.
स० – आतां विचार ह्मणून दुसरा करूंच नका. ही कांहीं तुझाला अंतर देणार नाहीं. मात्र पोरवय असल्यामुळे अपराध केल्यास क्षमा करा आणि हिला अंतर देवूं नका. मी काय दोन दिवसांची सोचतीण. माझ्या मार्ग हिचं कसं होईल हाणून मला मोठी काळजी होती. पण आतां तिनं आप