पान:रमानाटक.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

दे० – कां बरें ?कांहीं भीति आहे काय कोणाची ?
र० – अहाहा ! भारी लग्न झाल्यापासून अन्नवस्त्र दे- ऊन थकलांत किनई !
दे० – ( रागाने तिच्या अंगावर धांवून जातो ) ज्या- स्ती बोलतेस! (सखू त्यास घरते ) मामी सोडा हो.
र० – सोडलं तर काय कराल तुम्ही?
दे० – फांशी गेलो तर बेहेत्तर पण तुझा जीव घेईन.
स० – कांहीं धीर धरा, असं वेड्यासारखं काय करता?
र० - -जीव कांही वाटेवर आला नाहीं. आणखी हेच कां तोंड ?
स० – ( रमेस ) तूं गप बैस बोलू नको. (देव- जीस) तुह्मी जे इतके रागावलांत तर माझ्या पोरीनं काय करावं ! किती दुःख भोगावं ? तु- झाला हजार वेळां समजून सांगितलं तरी तुमचा दारूचा छंद सुटत नाहीं. उद्योग करायचा नाहीं मग चालेल कसं? आतां तिचे ल्यायचे नेसायचे दिवस, तिला कांहीं नको का? बरं ते असो. पण घरांत खायला तर पाहिजे. ह्या गोष्टींची तुम- च्या इथं पंचाईत, मग तिनं तरी काय करावं?
र० - आई मी तुला साफ सांगतें मी कांहीं आतां याच्या घरी रहाणार नाहीं. जें होणं असेल तें होईल. याचं तरी इतकं बोलणं पाहिजे कशाला?
दे० – ठीक आहे, तूं आज मेलीसच असे समजू-