पान:रमानाटक.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
रमानाटक.

कृ० - अर्से ह्मणून कोठें चालेल कां
र० – काय सांगूं. यानं किनई माझ्या आईला फारहो बुडावलं, आणि काम नको धंदा नको, दारू पि- ऊन हिंडायचं मग कसं बरं चालेल. मी तरी काय करावं? आईनं (थांबते).
कृ० – कां आईने काय केले?
र० – करायचं काय ? जन्माचं मातेरं केलं.
कृ० – गांत तिचा काय दोष तुझें नशीब.
र० – आजपर्यंत वाईट होतं पण आतां चांगलं झालं.
कृ० – कशानं !
र० – आपलं प्रेम जडल्यानं ( इतक्यांत रमेचा नवरा सखुस घेऊन येतो व दोघे बसलीं आहेत असे पाहून)
दे०- मामी पहा पहा, हें. अजूनही मी खोटाचका ? (रमा भिऊन बाजूस उभी राहते)
स० – जरा थांबा असे रागावूं नका.
दे० – फार चांगलं सांगतां.
स० – (रमेस) रमा कांग इथं आलीस.
र०– ( खाली मान घालून) मावशीला पत्र लिहि ण्याकरितां
दे० - (रागार्ने] अग चांडाळणी पत्र लिहिण्याची सवच सांगतेस काय ? [कृष्णरावास ] आणि हा हरामखोर लुच्चा [ असे ह्मणून त्यास मारण्यास धांवतो, सखु त्याला घरते व रमाही त्यास आ डवी येते. ]
स० – भलतंच करणं माझ्या कामास पडणार नाही.