पान:रमानाटक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

र० – ( पदराने डोळे पुसून) मी आहेना? तुम्ही दुःख कां करितां. तुमच्याकरतां आईचा सुद्धां बं दोबस्त केला. पण तिची आशा ठेवणार नाहीं. नव- ज्याला सोडीन, गणगोत नांवं ठेवतील त्याची लाज सोडीन परंतु ( गळा मिठी मारून) या जिवाला कधीं अंतर देणार नाहीं. ज्यास्त काय सांगूं हा जीव तुमच्या पायावर ठेवला आहे मारा अथवा तारा.
कृ० – याच तुझ्या वचनावर भरंवसा ठेवून मी मुझ्या शी स्नेह केला. तूं जर अशा रीतीने माझ्याशीं वागशील तर मीही घरदार आप्तवर्ग इष्टमित्र यांची भीती ठेवणार नाहीं.
र० - आतां मी बोलून काय दाखवूं.
क्रु० - ठीक आहे. परंतु तुला एक सांगून ठेवतों, नवऱ्याच्या घरी असून आपला स्नेह चालला ह्म- णजे फार चांगले होईल. कारण आह्मी पुरुष आहोत. आमचा बोभाटा झाला आणि आह्मी कांही जरी केले तरी हरकत नाही परंतु बायकांची स्थिति फार खराब आहे. त्या नवऱ्याजवळ राहून पाहि- जे तें करोत. परंतु एकदां नवरा सोडला ह्मणजे सौ- भाग्य जाऊन रांड ही पदवी येते. पुढे मग अखंड सौभाग्यवती होते.
र० -- आपल्या आज्ञे बाहेर मी वागणार नाहीं, परंतु मला किनई या नवऱ्याचा फार कंटाळा आला आहे.